रिलायन्सच्या जिओला अनिल अंबानींची टक्कर


देणार १९३ रुपयात रोज १जीबी डेटा
मुंबई : आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशननेही दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या डेटा स्पर्धेमध्ये उडी घेतली आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी आरकॉमने खास १९३ रुपयांचा प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओला हा प्लॅन टक्कर देणार आहे.

या प्लॅनमध्ये आरकॉमच्या ग्राहकांना १९३ रुपयांमध्ये २८ दिवस दररोज १जीबी 2G/3G/4G डेटा मिळेल. तर व्हॉईस कॉलिंगसाठी दररोज एसटीडी आणि लोकल ३० मिनिटे मिळणार आहेत. रिलायन्स जिओने डेटा दर स्वस्त करण्याची स्पर्धा सुरु केली आहे. आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या सर्वच आघाडीच्या कंपन्यांची ग्राहकांना एकमेकांपेक्षा स्वस्त प्लॅन देण्याची चढाओढ सुरु आहे. त्यात आता आरकॉमनेही उडी घेतली आहे.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)

Leave a Comment