अॅपलने नोकियाला दिले 2 अब्ज डॉलर


पेटेंटच्या प्रश्नावरून दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी अॅपन कंपनीने नोकिया या कंपनीला तब्बल 2 अब्ज डॉलर मोजले आहेत.

नोकिया आणि अॅपल या दोन कंपन्यांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पेटेंटवरून वाद झाला होता. हा वाद न्यायालयापर्यंत पोचला होता. मे महिन्यात दोन्ही कंपन्यांनी परस्पर सहमतीने तो वाद मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यासाठी अॅपलने नोकियाला एकरकमी दोन अब्ज डॉलरची रक्कम दिली आहे, असे टेकक्रंच या संकेतस्थळाने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले आहे. मात्र नोकिया या रकमेचे काय करणार आहे, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

पेटेंट चोरल्याच्या मुद्द्यावरून अॅपलने तिसऱ्या एका कंपनीवर अँटी-ट्रस्ट दावा दाखल केला होता. ही कंपनी नोकियासाठी काम करत होती. त्यानंतर नोकियाने अॅपलवर थेट दावा दाखल केला होता.

नोकियाने अॅपलच्या विरोधात युरोप आणि अमेरिकेत दावे दाखल केले होते. त्या दाव्यात 32 पेटेंटचा उल्लेख होता. यात डिस्प्ले, यूजर इंटरफेस, सॉफ्टवेयर आणि वीडियो कोडिंग तंत्रज्ञान यांचा समावेश होता.

Leave a Comment