
मुंबई : रिलायन्स जिओला मात देण्यासाठी भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘एअरटेल’ सज्ज झाली असून एअरटेलने या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात VoLTE सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. ग्राहकांना यामुळे फोर जी टेक्नोलॉजी बेस्ट मोबाईल फोन कॉल करणे शक्य होणार आहे.
‘जिओ’ची बाजी पलटून टाकणार एअरटेल ?
विशेष म्हणजे, केवळ रिलायन्स जिओकडेच भारतात आत्तापर्यंत VoLTE ही टेक्नोलॉजी उपलब्ध असल्यामुळे जिओच्या भरभराटीस चांगलीच मदतही झाली आहे. एअरटेल आता याच टेक्नोलॉजीसहीत जिओला मात देण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत पाच-सहा शहरांमध्ये एअरटेलने VoLTE टेस्टिंग केले आहे. ही सेवा या वर्षीच्या शेवटपर्यंत देशभरात सुरू होऊ शकेल. VoLTE या टेक्नोलॉजीमध्ये ग्राहकांना इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंगसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागत नाहीत.
