दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद


द मिंटने दिलेल्या बातमीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रूपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्यामुळे या वित्तवर्षात दोन हजारांच्या आणखी नोटा छापल्या जाणार नाहीत. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने अन्य नोटांच्या छपाईत वाढ केली आहे. यात २०० रूपयांच्या नोटांचाही समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने आत्तापर्यंत २ हजार रूपये मूल्याच्या ३.७ अब्ज नोटा छापल्या आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या १ हजार रूपयांच्या ६.३ अब्ज नोटांच्या जागी या २ हजाराच्या नव्या नोटा छापल्या गेल्या होत्या. दरम्यान ५०० रूपये मूल्याच्या नोटांची नवी सिरीज बाजारात आली असून त्यात काही फिचर्स नवी आहेत. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनल मध्ये इंग्रजी ए हे अक्षर छापले गेले आहे.

Leave a Comment