लेनोवोने किलर नोटचा टिझर केला प्रसिद्ध


लेनोवोने त्यांच्या सोशल चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ टिझरमधून आगामी स्मार्टफोनचे संकेत दिले आहेत. हा स्मार्टफोन कोणता असावा याचे अंदाज बांधले जात असून जाणकारांच्या मते हा फोन के ७ नोट असावा असे संकेत दिले जात आहेत.

लेनोवोच्या या टिझरमध्ये ३ स्मार्टफोन परफॉर्मन्स दाखविले गेले आहेत. पहिल्याला ब्रॅड ए, दुसर्‍याला ब्रँड बी व तिसर्‍याला किलरनोट असे संबोधले गेले आहे. पहिले दोन सर्वसाधारण परफॉर्मन्सचे असल्याचे दाखविताना तिसरा मात्र किलर असल्याचे संकेत दिले गेले आहेत. लेनोवोने गतवर्षी ऑगस्टमध्ये विबे के ५ नोट लाँच केला होता तर डिसेबंरमध्ये के ६ लाँच केला आहे. हे लक्षात घेता नवा फोन के सेव्हन असेल असा तर्क लढविला जात आहे.

Leave a Comment