अखेर स्नॅपडीलकडून फ्लिपकार्टची ऑफर मान्य


भारतीय ऑनलाईन बाजारात गेले अनेक दिवस स्नॅपडील व फ्लिपकार्ट यांच्यातील व्यवहाराची चर्चा होत असतानाच ई कॉमर्स स्नॅपडीलने फ्लिपकार्टकडून दिली गेलेली खरेदी ऑफर मान्य केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट ९०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५७९० कोटी रूपये मोजून स्नॅपडीलला आपलीशी करणार आहे. स्नॅपडीलकडूनही या ऑफरचा स्वीकार करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या दोन कंपन्या एकत्र आल्यामुळे भारतीय ऑनलाईन बाजारात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनला मोठेच आव्हान मिर्माण झाले आहे.

स्नॅपडीलची चालक कंपनी जॅम्पर इन्फोटेकने गेल्या आठवड्यात फ्लिपकार्टची ऑफर मान्य केल्याचे सांगितले आहे. आता केवळ भागधारकांचे मत घेणे बाकी आहे. स्नॅपडीलमध्ये जपानी कंपनी सॉफ्टबँकेची मोठी गुंतवणूक आहे व त्यामुळे सॉफटबँक हे डील होण्यासंदर्भात प्रयत्नशील होते असेही समजते. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या पाच वर्षात ई कॉमर्स बाजारात ५० टक्के वाढ झाली असून हा बाजार आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment