थ्री स्क्वेअर मार्केट कंपनी कर्मचार्‍यांना बसविणार चिप


थ्री स्क्वेअर मारकेट कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या शरीरात आरएफआयडी चिप बसविण्याचा पर्याय दिला असून या चिपचा उपयोग अनेक कारणांसाठी करता येणार आहे. तांदळाच्या आकाराची ही चिप कांही सेकंदात अंगठा व तर्जनी यांच्या मधल्या भागात बसविता येते व तिचा वापर कार्यालय उघडणे, दरवाजे उघडणे, संगणक लॉग इन करणे, फोटो कॉपी मशीन वापरणे, फोन अनलॉक करणे, बिझिनेस कार्ड देवाणघेवाण, स्वास्थ्यासंबंधी माहिती एकत्र करणे दुसर्‍या आरएफआयडी टर्मिनल बरोबर पैसे देवाणघेवाण अशा अनेक कारणांसाठी करता येणार आहे.

कंपनीचे सीईओ टोड वेस्टबी या संदर्भात लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, ही चिप नीपरफिल्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाने युक्त असून या तंत्राचा वापर क्रेडीट कार्ड, मोबाईलच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी होतो. कांही काळाने हे तंत्र मानकयुक्त होईल व त्याचा वापर पासपोर्ट, प्रवास, खरेदी अशा अनेक कारणांसाठी करता येईल. ही चिप स्वीडनच बोयोएक्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने तयार केली गेली आहे. १ ऑगस्ट रोजी ही चिप कर्मचार्‍यांना बसविण्याचा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना ही चिप शरीरात बसवायची नाही त्यांनी ती मनगटी घड्याळे, अंगठी, बँड मध्ये बसवावी असाही पर्याय कंपनीने दिला आहे.

Leave a Comment