आणखी एक धमाका करणार जिओ


मुंबई : कंपनींच्या वार्षिक बैठकीत रिलायंस जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फ्री फोन देण्याची घोषणा केली. सोबतच आता ही बातमी देखील मिळते आहे की जिओ आता फिक्स्ड लाईन सेवा देखील सुरु करण्याची तयारी करते आहे.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ४० व्या वार्षिक बैठकीत शेअरहोल्डरच्या प्रश्नांवर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी म्हटले की, पुढच्या टप्प्यात आपण घरे आणि उपक्रम या दोघांसाठी फिक्स्ड लाईन कनेक्टिविटी उपलब्ध करण्यासाठी ध्यान केंद्रीत करु. त्यांनी याआधी म्हटले होते की, जिओ पुढच्या १२ महिन्यात आपल्या वायरलेस नेटवर्कला ९९ टक्के लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी लक्ष्य केंद्रीत करेल. यामुळे ४जी वापरणाऱ्यांच्या लोकांमध्ये वाढ होणार आहे.

याआधी शुक्रवारी जिओने आपला ४जी रेडी हँडसेट लॉन्च केला. हा फोन फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. हा हँडसेट ५० कोटी लोकांना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी एक केबल देखील देणार आहे, जो टीव्हीला कनेक्ट करता येणार आहे. यामुळे फोनमधील गोष्टी तुम्ही मोठ्या स्क्रीनवर पाहू शकता.

Leave a Comment