गायीच्या मदतीने बनवता येणार एड्सविरोधी लस


नवी दिल्ली – देशात सध्या गोरक्षा, गोरक्षक आणि गोमांसावरून सुरू असलेल्या वादादरम्यानच अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. आता एचआयव्ही म्हणजेच एड्सविरोधी लस गायीच्या मदतीने बनवता येईल. गायीतील अँटिबॉडी म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमतेने एचआयव्हीचा परिणाम ४२ दिवसांत २० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो असा उल्लेख अमेरिकन जर्नल ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात करण्यात आला आहे.

४ गायींना यासाठी शास्त्रज्ञांनी या प्रयोगासाठी निवडले होते. या गायींना एचआयव्हीचे २-२ इंजेक्शन दिले गेले. एका महिन्यानंतर त्यांच्यामध्ये प्रतिरक्षी कोषिका विकसित होऊ लागले. या संशोधनानुसार, ३८१ दिवसांत हे अँटिबॉडीज एचआयव्हीचा परिणाम ९६ टक्के संपुष्टात आणून शकतात. जटील आणि जिवाणूयुक्त पचन तंत्रामुळे गायींमध्ये प्रतिकारक क्षमता जास्त विकसित होते, असे मानले जाते. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने हे खूप उपयोगी असल्याचे सांगितले. भारतात सुमारे २२ लाख एड्सबाधित रूग्ण आहेत.

मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता एड्समुळे कमी होते. अजूनपर्यंत यावर इलाज शोधण्यात यश आलेले नाही. यावर शास्त्रज्ञांकडून सातत्याने प्रयोग केला जात आहेत. गायीच्या मदतीने एक लस बनवता येईल, असे या अहवालात म्हटले आहे. या लसीच्या मदतीने एचआयव्ही पीडित व्यक्तीला पहिल्या टप्प्यातून वाचवता येऊ शकते. परंतु, मनुष्याच्या शरीरात अशी रोगप्रतिकारक क्षमता तयार होण्यास जास्त वेळ लागतो. उल्लेखनीय म्हणजे, वेद आणि पुराणांमध्येही गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण खूप उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. यात संशोधन व्हावे यासाठी केंद्र सरकारने १९ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment