फेरारीची जीटीसी फोर ल्यूसी भारतात येतेय


वेगवान कार बनविणार्‍या इटालियन फेरारीने त्यांची नवी फोर सीटर ग्रँड टुअरर जीटीसी फोर ल्यूसी, २ ऑगस्टला भारतात लाँच केली जात असल्याचे जाहीर केले असून या कारची किंमत आहे साडेचार ते पाच कोटी रूपये.गतवर्षी जिनिव्हा ऑटो शेा मध्ये तिने डेब्यू केला होता.

या सुपरकारला ६.३ लिटरचे व्हि १२ इंजिन, सेव्हन स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन सिस्टीम, फोर व्हील स्टीअरिंग दिले गेले असून त्यामुळे मागची चाके २ अंशाने स्टिअरअप करता येतात. यामुळे कार १००च्या स्पीडने धावत असतानाही मागची चाके फ्रंट चाकांच्या विरूद्ध दिशेने वळू शकतात परिणामी टर्निंग रेडिअस घटते. ० ते १०० चा वेग घेण्यास तिला ३.४ सेकंद लागतात व ० ते २०० च्या स्पीड ती १०.५ सेकंदात घेऊ शकते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३३५ किमी. इंटिरियर मध्ये या कारला १०.२५ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, ड्युअल कॉकपिट डिस्प्ले, जी फोर्स मीटर दिला गेला आहे.

Leave a Comment