नवी दिल्ली : जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनने पोलो जीटीआयची किंमत ६ लाख रुपयांनी कमी केली आहे. ही गाडी ज्या वेळी लॉन्च झाली त्यावेळी तिची किंमत २५.९९ लाख होती. ही दिल्लीतील एक्स शोरूम किंमत होती. आता त्याची किंमत १९.९९ लाख झाली आहे.
फॉक्सवॅगन पोलो जीटीआयची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी
याबाबत एनडीटीव्ही ऑटोने दिलेल्या बातमीनुसार फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की नवी किंमत १ जुलैपासून लागू झालेल्या गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्सप्रमाणे आहे. कंपनीने पहिल्या भागात भारतात पहिल्या लॉटमध्ये केवळ ९९ पोलो जीटीआय लॉन्च केल्या आहेत. ही नवी कार दुसऱ्या कारपेक्षा वेगळी आहे. यात १.८ लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात उतरवली होती.
या कारच्या केवळ ९९ युनिटची विक्री पहिल्या फेजमध्ये करण्यात आली. पोलो जीईटी मॉडेलमध्ये ४ सिलेंडरचे १.८ लीटरचे TSI इंजिन आहे. फॉक्सवॅगनचे हे दमदार इंजिन १८९ bhpची पॉवर आहे. तर २५० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. याचा टर्बोचार्ज्ड इंजिनसह सात स्पीडचा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे. सर्व ९९ युनिटची विक्री झाली आहे. तर काही कार डिलर्सकडे आहे. कंपनी आता दुसऱ्या लॉटवर काम करत आहे.