उद्या लाँच होणार जिओचा फीचर फोन!


मुंबई : एका वर्षाच्या आत १२ कोटांपेक्षा जास्त ग्राहक जिओने जोडल्यानंतर रिलायन्स आता आणखी एक धमाका करणार आहे. उद्या म्हणजे २१ जुलैला रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन मुंबईत लाँच केला जाणार आहे. याच दिवशी कंपनीच्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

चायनिज कंपनीकडून जिओचा हा फोन बनवला जाईल, असे बोलले जात होते. पण याबाबत ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार हा फोन भारतीय बनावटीचा असेल. कारण इंटेक्स कंपनी हा फोन तयार करणार आहे. जो ऑगस्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. जिओचा हा फीचर फोन याच तिमाहीमध्ये लाँच केला जाईल. याबाबत रिलायन्स जिओशी चर्चा झालेली आहे, अशी माहिती इंटेक्स कंपनीने दिली.

२१ जुलैला लाँच होणाऱ्या या 4G VoLTE फीचर फोनची किंमत ५०० रुपये असेल, अशी माहिती आहे. २जी ग्राहकांपर्यंत ४जी सेवा पोहचवण्यासाठी ही किंमत ठेवण्यात आली आहे, असे एचएसबीसीचे टेलीकॉम अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment