रिजर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयाची नवी नोट !


मुंबई – लवकरच २० रुपयाची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँक चलनात आणणार आहे. पण सध्या चलनात असलेल्या जुन्या २०च्या नोटसुद्धा यापुढे वापरता येतील. त्या बंद होणार नाहीत.

महात्मा गांधी सिरीज २००५मध्ये या नव्या नोटेची भर पडणार आहे. या नवीन नोटेच्या नंबर पॅनलवर इंग्लिशमधील ‘एस’ अक्षर असणार आहे. तसेच या नोटांवर गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही असेल. रिर्जव्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नंबरच्या रकान्यात ‘एस’ अक्षर असेल तर डिझाईनमध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही. या नोट जुन्या नोटांसारख्याच असतील.

Leave a Comment