एमब्रानचा नवा स्मार्टबॅण्ड लाँच, किंमत १७९९ रुपये


मुंबई: नवा स्मार्टबॅण्ड एएफबी-११ फ्लेक्सी फिट नुकताच कम्प्युटर अॅक्सेसरीज कंपनी एमब्रानणे लाँच केला आहे. या स्मार्टबॅण्डची किंमत फक्त १७९९ रुपये आहे. यूजर्सला या बॅण्डचा बराच फायदा होऊ शकतो. हा बॅण्ड यूजरची दिवसभरातील शारीरिक हालचाल किती आहे आणि किती कॅलरीज कमी झाल्या याचा हिशोब ठेवतो.

याबाबत माहिती देताना एमब्रानचे संचालक गौरव दुरेजा यांनी सांगितले की, आम्ही स्वत:ला पॉवर बँक आणि ऑडिओ क्षेत्रात सिद्ध केल्यानंतर आम्ही आता वेयरेवल जगतात पाऊल टाकले आहे. आम्ही हा बॅण्ड फिटनेस चाहत्यांना लक्षात घेऊन लाँच केला आहे. हे फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस स्टायलिश कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आले आहे. फ्लेक्सी फिटला आयओएस किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनशी जोडता येणार आहे. हा बॅण्ड वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ आहे. या स्मार्टबॅण्डमध्ये ६० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment