मर्सिडीज-बेन्झने जारी केले आपल्या पिकअप ट्रकचे फोटो!


मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मर्सिडीज बेन्झने पिकअप ट्रकची संकल्पना मांडली होती. त्यानुसार आता मर्सिडीजने आपल्या पहिल्या पिकअप ट्रक ‘एस-क्लास’चे फोटो जारी केले आहेत.

एस-क्लास पिकअप ट्रक पुढल्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील बाजारात आणला जाणार असून, त्यानंतर दक्षिण अमेरिका, युरोप, अर्जेंटिना आणि ब्राझिलसह अनेक देशातील बाजारात हा ट्रक विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. मर्सिडीज एक्स-क्लास हा जगातील पहिला लग्झरी पिकअप ट्रक असेल. मर्सिडीजने या पिकअप ट्रकची विभागणी प्युअर, प्रोग्रेसिव्ह आणि पॉवर अशा तीन व्हेरिएंटमध्ये केली आहे. त्यात एक पेट्रोल आणि दोन डिझेल असे पर्याय असतील.

२.० लीटरचे ४ सिलेंडर इंजिन पेट्रोल व्हेरिएंटमध्ये देण्यात येतील, तर १६५ पीएस पॉवर आणि २३७ एनएम टॉर्क देण्यात येईल. २.३ लीटरचे ४ सिलेंडर इंजिन पहिल्या डिझेल व्हेरिएंटमध्ये देण्यात येतील, हे इंजिन दोन पॉवर ट्युनिंगसोबत असतील. यामध्ये १६३ पीएस पॉवर आणि ४०३ एनएम टॉर्क असेल. दुसऱ्या डिझेल व्हेरिएंटमध्ये १९० पीएस पॉवर आणि ४५० एनएम टॉर्क असेल.

Leave a Comment