तुमचा बँक तपशील चोरी करु शकतो हा व्हॉट्सअॅप मेसेज !


मुंबई : नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना काही दिवसांपूर्वीच समोर आल्या. आता देशभरातही अशी प्रकरणे समोर येत असल्याने जीवनावश्यक गरज बनलेले व्हॉट्सअॅप वापरताना खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण तुमचे बँक तपशील आता चोरी करु शकणारे मेसेजही व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहेत.

तुमचे फ्री व्हॉट्सअॅप सबस्क्रीप्शन संपले आहे. सेवा चालू ठेवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन पेमेंट करा, असा मेसेज व्हॉट्सअॅपच्या नावाने व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट ऑप्शनमध्ये जाता, त्यानंतर तुमचा बँक तपशील चोरी केला जातो. सध्या इंग्लंडमधील यूझर्सना हा मेसेज येत असल्यामुळे भारतातही असे फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉट्सअॅप सेवा सध्या फ्री आहे, त्यासाठी कोणतेही पैसे मोजण्याची गरज नाही, हे यूझर्सने लक्षात ठेवण्याची गरज आहे.

Leave a Comment