नव्या अवतारात लॉन्च झाले नोकियाचे १०५ आणि १३० फोन


मुंबई – नोकिया ३३१०नंतर नोकिया आणि एचएमडी ग्लोबलने त्यांचा जुना फिचर फोन नोकिया १०५ (२०१७) आणि नोकिया १३०(२०१७) ला नव्या अवतारात पुन्हा बाजारात आणले आहे. सिंगल आणि ड्युअल सिम व्हेरिएंटमध्ये हे दोन्ही फोन लॉन्च झाले आहेत. या दोन्ही फिचर फोनच्या माध्यमातून भारतातील फिचर फोनच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा पाय रोवण्याचा उद्देश आहे.

१९ जुलैपासून देशभरातील रिटेल स्टोरमध्ये नोकिया १०५ ची विक्री सुरू होईल. या फोनच्या सिंगल सिम व्हेरिएंटची किंमत ९९९ रूपये आणि ड्युअल सिमची किंमत १ हजार १४९ रूपये आहे. एचएमडी ग्लोबलचे या फोनच्या किंमतीबद्दल म्हणने आहे की, हा कंपनीचा असा पहिला फोन आहे ज्याची किंमत १ हजार रूपयांपेक्षा कमी आहे. नोकिया १३०च्या विक्रीबद्दल आणि किंमतीबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही.

नोकिया १०५मध्ये मायक्रो यूएसबी २.० चार्जिंग पोर्ट, ३.५mmचे ऑडिओ जॅक, १.८ इंचाचा QVGA कलर डिस्प्ले, 15 तास टॉकटाईम बॅटरी बॅकअप, स्नेक गेम, नोकिया ३०+ सॉफ्टवेअर, ४ एमबी रॅम, ४ एमबी स्टोरेज आणि ८००mAh क्षमतेची बॅटरी आहे.

कंपनीने या फोनबद्दल असा दावा केला आहे की, नोकिया १३०मध्ये ४४ तासांचा एफएम रेडिओ प्लेबॅक टाईम मिळेल. या फोनमध्ये १.८ इंचाची QVGA स्क्रीन, ब्लूटूथ सपोर्ट, कॅमेरा, नोकिया ३०+ सॉफ्टवेअर, ३.५mm ऑडिओ जॅक, ४ एमबी रॅम आणि ८ एमबी स्टोरेज आहे. नोकिया १०५ ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक रंगांच्या व्हेरिएंटमध्ये मिळणार, तर नोकिया १३० रेड, ग्रे आणि ब्लॅक रंगांमध्ये मिळणार आहे.

Leave a Comment