
मुंबई : पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर रिलायन्स जिओने लॉन्च केली असून यामध्ये ग्राहकांना जिओने ३४९ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांपर्यंत अनलिमिटेड ४जी इंटरनेट आणि फोन कॉल्स सुविधा मिळतील. युजरला यामध्ये २० जीबी डेटा मिळेल. युजरवर आहे त्याने डेटा कसा वापरावा. एकाच दिवशी पूर्ण २० जीबी डेटा देखील वापरु शकतो किंवा ५६ दिवसांपर्यंत देखील वापरु शकतो. दिवसाला १ जीबी ४ जी डेटा मिळेल. त्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होईल. परंतू इंटरनेट अनलिमिटेड चालू राहील. स्पीड फक्त १२८ केबीपीएस होईल.
३४९ रुपयात ५६ दिवसांपर्यंत अनलिमिटेड ४ जी डेटा देणार जिओ
जिओने ३०९ रुपयांच्या प्लानमध्ये थोडा बदल केला आहे. यामध्ये आता यूजर्सला ५६ दिवसांची वैधता मिळत आहे. शिवाय रोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुविधा मिळत आहे. रोज ४ जी १ जीबी डेटा मिळेल. रोजचा डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड १२८ केबीपीएस होईल. हा प्लान जिओच्या प्राईम मबरर्ससाठी आहे.
