रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर झाला उमेश यादव


नागपूर: तिलक यादव यांनी १० वर्षांपूर्वी आपला सर्वात लहान मुलगा उमेश याला सरकारी नोकरीवर लागल्याचे स्वप्न पाहिले होते. पोलिसात भरती होण्यासाठी उमेशने तयारीही केली होती. पण तो थोडक्यात या नोकरीपासून दूर गेला होता. तो आज टीम इंडियाचा उत्तम जलदगती गोलंदाज आहे. पण उमेशला आता एक चांगली नोकरीही मिळाली आहे.

रिझर्व्ह बॅंक बॉफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादव याला नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील औपचारिकता २९ वर्षीय उमेश यादवने पूर्ण केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या नोकरी संदर्भात मे महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीपासूनच बोलणी सुरू झाली होती. त्याला स्पोर्ट कोट्यातून नोकरी देण्याचा निर्णय अधिका-यांनी घेतला होता.

Leave a Comment