कोकण रेल्वेवर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या


मुंबई : मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. रेल्वेने याआधी १४२ जादा फेऱ्यांची घोषणा केली होती. या मार्गावर पनवेल ते सावंतवाडी, कुर्ला टर्मिनस-एलटीटी ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या गाड्या चालणार आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून जादा फे-या सोडल्या जातात. आता आणखी ६० जादा फेऱ्यांची घोषणा केल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पनवेल-सावंतवाडी विशेष ट्रेन १९ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी संध्याकाळी ७.३५ मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडील दुस-या दिवशी पहाटे ४.२० मिनिटांनी पोहोचेल. मध्य रेल्वेनं पहिल्यांदा पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडी सोडली आहे. त्यामुळे पनवेल आणि त्यापुढील प्रवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Comment