एकाच दिवसात मोटो ई ४ प्लसची विक्रमी विक्री


मुंबई : भारतात लेनोव्होचा मोटो ई ४ प्लस लाँच होताच या फोनने विक्रीचा विक्रमी आकडा गाठला असून पहिल्या २४ तासात या स्मार्टफोनच्या १ लाख यूनिटची विक्री झाली. तर पहिल्या ६० मिनिटांमध्ये प्रति मिनिट ५८० यूनिट विकले गेल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.

बुधवारी मोटो ई ४ प्लस लाँच झाल्यानंतर रात्री १२.०० वाजता फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरु झाली. विक्री सुरु होताच जवळपास दीड लाख ग्राहकांनी पेजला भेट दिली, असा दावा फ्लिपकार्टने केला आहे. मोटो ई ४ प्लसची भारतातील किंमत ९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन देशभरात ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटो ई ४ प्लस खरेदी करताना मोटो प्लस २ चे १५९९ रुपये किंमतीचे हेडफोन ७४९ रुपयांत मिळणार आहेत.

याशिवाय हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. आयडिया ग्राहकांना ४४३ रुपयात तीन महिन्यांसाठी ८४ जीबी डेटा दिला जाईल. जिओच्या ग्राहकांना जिओ प्राईम अधिक ३० जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर या फोनवर ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर आणि ४ हजार रुपयांच्या बायबॅक गॅरंटीचीही कंपनीने घोषणा केली आहे.

Leave a Comment