आयडिया देणार तब्बल ८४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग


मुंबई: आयडियाने रिलायन्स जिओच्या प्लानला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान आणला आहे. यामध्ये यूजर्संना ४५३ रुपयात ८४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. नुकताच जिओने ३९९ रुपयांच्या नवा प्लान आणल्यानंतर आता आयडियाने देखील आपला नवा प्लान आणल्यामुळे आयडियाची ही कल्पना प्रत्यक्षात लोकांच्या पसंतीस पडते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपली ‘धन धना धन’ ऑफर रिलायन्स जिओने नव्याने आणल्यानंतर आता आयडियाने देखील कंबर कसली आहे. तीन महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि ८४ जीबी डेटा जिओच्या प्लानमध्ये दररोज देण्यात येणार आहे. तर आयडियाच्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. ज्याची वैधता ८४ दिवसांसाठी असणार आहे. जिओकडे वळलेले कस्टमर्स आता खेचून घेण्याचे आव्हान आयडीयासमोर आहे.

Leave a Comment