जिओच्या स्वस्त ४जी फोनचे फोटोज लीक


फोटो सौजन्य TechPP
नवी दिल्ली – ग्राहकांना फ्री इंटरनेट डेटा आणि कॉल्सची सुविधा देत रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता बाजारात आणखीन एक धमाका करण्याच्या तयारीत जिओ आहे. रिलायन्स जिओ आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी ४जी फोन बाजारात आणणार आहे. त्याचबरोबर या फोनची किंमत केवळ ५०० रुपये असणार आहे.

५०० रुपयांत ४जी फोन लाँन्च करण्याच्या तयारीत रिलायन्स जिओ असताना आता आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे Lyf ब्रॅन्डच्या जिओ VoLTE फोनचे फोटोज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. रिलायन्स जिओच्या या ४जी फीचर फोनचे फोटोज TechPP ने शेअर केले आहेत. इतकेच नाहीतर फोनच्या फीचर्सचाही खुलासा केला आहे. या फोटोजनुसार, फोन Kai ऑपरेटिंग सिस्टिवर काम करेल, जो HTML5 च्या आधारित फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमचा स्प्लिट व्हर्जन आहे.

रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA TFT डिस्प्ले आणि ५१२ एमबी रॅम असणार आहे. तसेच, ४जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर, १२८ जीबी पर्यंत मेमरी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज वाढविता येणार आहे. २ मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट देण्यात येणार असून फोनच्या बॅटरीची क्षमता २०००mAh ऐवढी असणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ याच महिन्यात ४जी फोन सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment