भारतीय रल्वेच्या सौर उर्जेवर धावणाऱ्या ट्रेनचा पहिला प्रवास


नवी दिल्ली: भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली रेल्वे दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेनशवरून शुक्रवारी धावली. ही ट्रेन दिल्लीच्या सराय रोहिल्ला स्टेशनवरून हरियाणाच्या फारूख नगर स्टेशनपर्यंत सध्यास्थितीत प्रायोगिक तत्वावर चालणार आहे. १६ सौर पॅनल आठ डब्यांच्या या ट्रेनला लावण्यात आले आहेत. मेक इन इंडिया या अभियानाअंतर्गत बनवलेल्या या रेल्वेला ५४ लाख रूपये खर्च आला. जगातील हा पहिलाच प्रयोग असून ज्यात सौर पॅनलचा वापर रेल्वेच्या ग्रिडमध्ये केला जात आहे.

हा पर्याय ट्रेनमध्ये पावर बॅक-अप असून, ७२ तासांचा प्रवास ही ट्रेन बॅटरीवर सहज करू शकते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेनबाबत घोषणा केली होती. प्रभू म्हणाले होते, भारतीय रेल्वे पूढील ५ वर्षांमध्ये १००० मेगावॉट वीज निर्मिती करेल. सौर उर्जा युक्त ट्रेन हा या घोषणेच्या पूर्ततेतीलच एक भाग आहे.

Leave a Comment