दोन दिवसांसाठी माळशेज घाटातील वाहतूक बंद


जुन्नर : माळशेज घाटातील वाहतूक शुक्रवारी मध्यरात्रीपासून दोन दिवसांसाठी जोरदार पावसामुळे रस्ता खचल्याने बंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी घाटाच्या सुरवातीला असलेल्या पर्यटन निवास स्थानाजवळ चौकात अडथळे उभारुन रस्ता बंद केला. कोणतीही माहीती नसल्यामुळे आज सकाळी या मार्गाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अचानक घाट बंद केल्याने त्रास सहन करावा लागत आहे. तर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पावसाळ्यात माळशेज घाटात कायम दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. आता रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment