मुंबई शेअर बाजाराने प्रथमच ओलांडला ३२ हजाराचा टप्पा


मुंबई : इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ओलांडला आहे. व्याजाचे दर काल जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीमुळे खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेही काहीशी मवाळ होऊन व्याजदर कमी करेल अशी बाजाराला आशा आहे.

बँकिंग क्षेत्रात आज त्यामुळे बाजार उघडताच मोठी खरेदी बघायला मिळाली. त्यासोबत व्याजदाराशी संबंधित असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कंपन्यांमध्येही मोठी खरेदी होत आहे. निर्देशांकात या दोन्ही क्षेत्रांचे मोठा हिस्सा असल्यामुळे आज सेन्सेक्सने उघडताच सुमारे दीड टक्क्याची उसळी मारून ३२ हजाराचा टप्पा ओलांडला. तिकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही नवा उच्चांक प्रस्थापित करून ९ हजार ९००च्या टप्प्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

Leave a Comment