जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर ३ टक्के जीएसटी


नवी दिल्ली : तुम्ही तुमचे जुने दागिने जर विकणार असाल तर त्यावर देखील तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सोन्याच्या खरेदी विक्रीवर म्हटले आहे की, तुम्ही जर जुने दागिने विकले आणि त्याच पैशात जर तुम्ही नवीन दागिने घेतले तर जुन्या दागिन्यांवर दिलेला ३ टक्के जीएसटी वजा केला जाईल.

अढिया यांनी पुढे म्हटले की, समजा की मी एक ज्वेलर आहे. माझाकडे कोणता व्यक्ती जुने दागिने घेऊन आला. यावर मी ३ टक्के जीएसटी कर त्याच्याकडून घेईल. जर दागिने १ लाखाचे असतील तर त्यावर ३ हजार जीएसटी लागेल. आता दागिने विक्रीतून मिळालेले ९६००० मधून जर मी नवीन दागिने घेतले. तर त्यावर लागणाऱ्या जीएसटी करातून ३ हजार रुपये वजा केले जातील. महसूल सचिव यांच्या मते, जर ज्वेलरकडे तुम्ही जुने दागिने घेऊन घेलात आणि त्यावर काही बदल किंवा अजून काही काम केले तर तो जॉब वर्क मानला जाईल आणि यावर ५ टक्के जीएसटी कर लागू होईल.

Leave a Comment