‘इमॅजिका’चा मान्सून धमाका


पुणे – लेझी संडे, लोनावला से लोनावला तक आणि बॅक टू कॉलेज या विशेष मान्सून ऑफर्स खोपोलीजवळील इमॅजिकाने पर्यटकांसाठी सादर केल्या आहेत. अन्यत्र कुठेच राइड्सची मजा, रोलर कोस्टर्स दिसणार नाहीत अशा विशिष्ट थीमवर आधारित उपक्रम अशी अनेक आकर्षणे यात असून, यासाठी इमॅजिकाने तिकिटांवर सवलती आणि मुक्कामाची खास पॅकेजेस सादर केली आहेत.

रविवारी इमॅजिकाला मंगळवारी आणि बुधवारी दिल्या जाणाऱया सवलतींशिवाय ‘लेझी संडे’ या पॅकेजमध्ये येण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याला जाणा-यांसाठी ’लोनावला से लोनावला तक’ ही विशेष ऑफर असून, लोणावळ्याहून पिक-अप करून थेट इमॅजिकाच्या तिकीट खिडकीशी सोडण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या जेवणाचाही या पॅकेजमध्ये समावेश आहे. ’बॅक टू कॉलेज’ऑफरमध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजचे ओळखपत्र दाखवल्यास तिकिटावर सवलत आहे. ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असून, ५९९ रुपयांपासून तिकीट दर आहे.

Leave a Comment