न्यूयॉर्क आणि अबुधाबी व्यवसायासाठी सर्वोत्तम शहर


न्यूयॉर्क – व्यवसाय करण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे सर्वात प्रसिद्ध शहर असून त्यानंतर अबुधाबी, लंडन, हाँगकाँग आणि टोकियो या शहरांचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करण्यासाठी दिल्लीचा ४० वा क्रमांक असून त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो, असे आयप्सोस टॉप सिटीज २०१७ अहवालामध्ये म्हटले आहे.

व्यवसायासाठी न्यूयॉर्क आणि अबुधाबी ही दोन्ही शहरे सर्वोत्कृष्ट, समांतर असून राहणीमान आणि भेट देण्यासाठी त्यामानाने कमी गुण प्राप्त केले. झुरिच आणि सिडनी ही दोन शहरे राहणीमानासाठी सर्वोत्तम आहेत. लंडन आणि टोकियो या दोन्ही शहरात अनेक बाबतीत साम्य आहे. पॅरिस हे पर्यटनासाठी सर्वोत्तम शहर आहे.

२६ देशातील नागरिकांना हा अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणे, राहणीमान आणि भेटीसाठी सर्वोत्तम शहरे कोणती याची माहिती गोळा करण्यात आली. भारतीयांनी आपले सर्वात आवडते शहर म्हणून अबुधाबीला पहिले स्थान दिले. यानंतर सिंगापूर, मुंबई, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली, सिडनी, लॉस एन्जिलिस आणि बँकॉक यांचा क्रमांक लागतो. राहणीमानासाठी अबुधाबी, मुंबई, सिंगापूर, दिल्ली, लंडन, पॅरिस, सिडनी, न्यूयॉर्क, झुरिच आणि लॉस एन्जिलिस यांची निवड केली.

Leave a Comment