पब्लिक डेटा ऑफिसच्या स्कीमपुढे जिओदेखील होणार फेल


मुंबई : सध्या दिवसेंदिवस मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये सुरु असलेली स्पर्धा वाढतच चालली असून आता यामध्ये ट्राय म्हणजेच टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने भर टाकली आहे. लवकरच पब्लिक वायफाय हॉटस्पॉटचे पायलट प्रोजेक्ट ट्राय सुरू करणार आहे. ट्रायचे हे प्रोजेक्ट पब्लिक डेटा ऑफिसच्या नावाने सुरू होणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या फोन बूथ प्रमाणेच हे वायफाय वापरता येणार आहे.

या स्कीमबाबत ट्रायकडून सध्यातरी कोणतेही स्पष्टीकरण आले नसले तरी सुरुवातीला ही स्कीम २ रुपये ते २० रुपयांमध्ये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. हे वायफाय वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचा केवायसी आणि ओटीपीचा वापर करावा लागणार आहे. पब्लिक वायफाय हॉटस्पॉटमुळे नागरिकांना स्वस्तामध्ये इंटरनेट वापरायला मिळेल तसेच नेटवर्कवरचा ताणही कमी होईल, असे ट्रायकडून सांगण्यात येत आहे. ट्रायने हे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अॅप प्रोव्हायडर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. या प्रोजेक्टसाठी कंपन्यांना २५ जुलैपर्यंत तपशील द्यावा लागणार आहे.

Leave a Comment