
नवी दिल्ली – रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. धन धना धन ऑफर अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे त्यांनी नवीन ऑफर सादर केली असून हा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांसाठी असल्याचे सांगण्यात येते. जिओ धन धना धन ऑफर या नावानेच कंपनीने ही नवीन ऑफर सादर केली आहे. या प्लॅनचे नावच फक्त जुने आहे. बाकी सर्व नवीन असून यात अनेक बदल करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे जिओ प्राइम मेंबरशिप असणे आवश्यक आहे. जिओच्या प्रीपेड प्लॅनची सुरूवात १९ रूपयांपासून होते आणि सर्वात महागडा प्लॅन हा ९९९९ रूपयांचा आहे.
जिओ देणार ३९९ रूपयांत ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा
कंपनीने जिओ धन धना धनच्या ऑफरमध्ये सुरूवातीला ३०९ रूपयांच्या रिचार्ज पॅकवर एक महिन्याची वैधता असल्याचे म्हटले होते. याच प्लॅनमध्ये ग्राहकांना आता ५६ दिवसांची वैधता मिळेल आणि ५६ जीबी ४ जी स्पीड डेटा देण्यात येईल. तर दुसरा प्लॅन ३९९ रूपयाचा असेल. याची वैधता ८४ दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी ४ जी स्पीड डेटा मिळेल. तर पोस्टपेड प्लॅनची सुरूवात ३०९ रूपयांपासून होते.
