अॅमेझॉन देत आहे एका टीव्हीवर १ टीव्ही फ्री


नवी दिल्ली: कालपासून ऑनलाईन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑनलाईन सेलला सुरूवात झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या या सेलमध्ये एकाहून एक सरस अशा ऑफर्सचा समावेश आहे. केवळ ऑफर्सच नव्हे तर, घसघशीत डिस्काऊंट आणि कॅशबॅकही उपलब्ध आहे. अॅमेझॉन या सेल अंतर्गत एका टीव्हीच्या खरेदीवर एक टीव्ही फ्रिसुद्धा देत असल्यामुळे तुम्ही जर काही खरेदी करू इच्छित असाल तर, त्वरा करण्यास हकरत नाही.

दरम्यान, भारतात अॅमेझॉनकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘प्राईम डे’ सेल आयोजीत केला आहे. हा सेल काल सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला असून, पूढील ३० तासांपर्यंत चालणार आहे. या सेलमधील ऑफर्सचा चांगलाच फायदा अॅमेझॉन प्राईमचे सभासद उठवू शकतात.

‘प्राईम डे’च्या निमीत्ताने अॅमेझॉन आपल्या सदस्यांसाठी २० नवे प्रॉडॉक्ट लॉंच करणार आहे. तसेच, या २० पैकी ज्या प्रॉडक्टला अधिक मागणी आहे त्या प्रॉडक्टवर मोठी सुट दिली जाणार आहे. दरम्यान, अॅमेझॉन टीसीएल कंपनीच्या टीव्हीवर प्राईम युजर्सना मोठी ऑफर देत आहे. टीसीएलच्या एक टीव्ही खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला १ टीव्ही फ्री मिळणार आहे. तसेच, ५५ इंचाच्या एण्ड्रॉयड स्मार्ट टीव्ही सोबत टीसीएलचा एचडी रेडी टीव्ही (३२ इंच) फ्री मिळणार आहे. याशिवाय अनेक प्रॉडक्टवर चांगली ऑफर आणि सूटही मिळेल. एचडीएफसीच्या क्रेडीट कार्डवर खरेदी केल्यास तुम्हाला १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅकही मिळेल.

हा सेल जगातील तब्बल १३ देशांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आला असून, या सेलअंतर्गत मिळणाऱ्या प्रॉडक्टच्या उत्पादक कंपन्यांशी अॅमेझॉनने करार केला आहे. अॅमेझॉनची प्राईम मेंबरशीर घेण्यासाठी ४९९ रूपये भरावे लागतात. प्राईम मेंबरशीपचा कालावधी एक वर्षांचा असून, त्यासोबत अॅमेझॉनच्या अनेक ऑफर्सच फायदा घेता येतो.

Leave a Comment