आता खाद्यपदार्थ विकणार अॅमेझॉन


नवी दिल्ली – आता देशात खाद्यान्नाचीही विक्री अॅमेझॉन करणार आहे. अॅमेझॉनच्या भारतातील खाद्यान्न विक्रीसाठीच्या ३,२०० कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. विदेशी गुंतवणूक प्रमोशन मंडळाकडे हा प्रस्ताव ताटकळत होता. हे मंडळ बंद करण्यात आल्याने आता या प्रस्तावाला औद्योगिक धोरण आणि प्रमोशन विभागाने मंजुरी दिली.

अॅमेझॉनच्या या प्रस्तावानुसार, कंपनी भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या मालकीची उपकंपनी सुरू करेल. अन्नपदार्थांची साठवणूक ही उपकंपनी करणार आणि ऑनलाईन विक्री करण्यात येईल. अन्नप्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट विदेश गुंतवणुकीला सरकारने परवानगी दिली आहे. या नवीन नियमानुसार, कोणतीही विदेशी कंपनी संपूर्ण मालकी असणारी उपकंपनी भारतात सुरू करू शकेल. देशात उत्पादित होणाऱया अन्न पदार्थांची विक्री करण्यासाठी दुकान उघडण्यास आणि ऑनलाईन विक्रीस परवानगी आहे.

Leave a Comment