५० हजारांखालील गिफ्ट वर नाही लागणार जीएसटी


नवी दिल्ली : जीएसटी लागू केल्यानंतर देशात सेवा आणि वस्तूंच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले असून जीएसटीबाबत लोकांमध्ये आजही संभ्रमाचे वातावरण आहे. जनतेत आजही वाढलेल्या किंमतीबद्द्ल नाराजी आहे. त्यात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे गिफ्ट दिल्यास त्यावर जीएसटी द्यावा लागेल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज केलेल्या एका ट्विटमध्ये नमूद केल्यामुळे लोकांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या गिफ्टच्या अनुशंगाने हे ट्विट करण्यात आले आहे. वर्षभरात दिल्या जाणाऱ्या गिफ्ट्सची किंमत ५० हजारांच्या आत असल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ५० हजारांच्यावर खरेदी करणाऱ्यांना थोडे पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. जीएसटीमुळे होणारे परिणाम हळूहळू जसजसे लोकांच्या लक्षात येत आहेत तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत.

Leave a Comment