
मुंबई: रिलायन्स जिओसोबत मोबाइल कंपनी आसुस इंडियाने आपल्या यूजर्ससाठी भागीदारी केली असून आसुस इंडियाच्या या भागीदारीमुळे आता जिओ यूजर्सला जास्तीचा डेटा मिळणार आहे. ज्यांनी १६ जूननंतर आसुसचा स्मार्टफोन खरेदी केला आहे त्यांना जिओच्या ‘एक्स्ट्रा डेटा’चा फायदा मिळणार आहे.
जिओ उपभोगत्यांना आसुस स्मार्टफोनवर मिळणार तब्बल १०० जीबी एक्स्ट्रा डेटा
आसुसच्या स्मार्टफोन यूजर्सला या ऑफरमध्ये तब्बल १०० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. पण हा एक्स्ट्रा डेटा ३ ग्रुपमध्ये विभागण्यात आला आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असुस जेनफोन सेल्फी, जेनफोन मॅक्स, जेनफोन लाईव्ह आणि जेनफोन गो स्मार्टफोन्सवर ३०९ किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर ३जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल. पण १० रिचार्जपेक्षा जास्त रिचार्जवर एक्स्ट्रा डेटाचा लाभ मिळणार नाही. दुसऱ्या ग्रुपमध्ये आसुस जेनफोन २, जेनफोन २ लेझर, जेनफोन ३S मॅक्स आणि जेनफोन ३ मॅक्स हे स्मार्टफोन असणार आहे. या ग्रुपमध्ये जिओच्या सिमवर ३०९ रुपयाच्या रिचार्जवर ५जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये असुस स्मार्टफोन यूजर्सला १० जीबी डेटा मिळणार आहे. या ग्रुपमध्ये असुस जेनफोन झूम, जेनफोन ३ डीलक्स, जेनफोन ३ अल्ट्रा आणि जेनफोन ३ हे स्मार्टफोन आहेत. या सर्व स्मार्टफोनमध्ये १० रिजार्जवर यूजर्सला एक्स्ट्र डेटा मिळणार आहे.
ही ऑफर मिळवण्यासाठी सर्वात आधी यूजरला आपल्या असुस स्मार्टफोनवर माय जिओ अॅप इंस्टॉल करावा लागणार आहे. यानंतर यूजर्सला माय वाउचरचा ऑप्शन ओपन करावा लागेल. यानंतर यूजरला व्हीयू वाउचरच्या माध्यमातून एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता. या ऑफरमध्ये मिळणारा डेटा हा ४८ तासात अॅक्टिव्हेट होईल. तसेच ही ऑफर मिळवणाऱ्या यूजर्सला जिओच्या दुसऱ्या ऑफर मात्र मिळणार नाही.
