या शिवलिंगात विज्ञान व श्रद्धेचा संगम


सुरत जवळ असलेल्या ३०० वर्षे प्राचीन हरून मुक्तेश्वर पंचदेवालय मंदिरात असलेल्या शिवलिंगात विज्ञान व श्रद्धा याचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या प्राचीन मंदिराचे पुनर्निमाण ऐना या गावच्या लोकांनी केला आहे. म्हणेज या गावातील जे एनआरएआय आहेत त्यांनी सात कोटी रूपये जमा करून येथे १० फूट लांबीचे व ५० टन वजनाचे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केले आहे. विशेष म्हणजे जगभरातील १५ देशांतून दरवर्षी हे भाविक भोलेनाथाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.

हे शिवलिंग भव्य तर आहेच पण ते स्थापन करताना ७ टन पारा वापरला गेला आहे. या मंदिराच्या गाभार्‍यात ॐ चे उच्चारण केले असता येंणार्‍या व्हायब्रेशन्समुळे चांगली उर्जा निर्माण होते असे सांगितले जाते. पिंडीच्या शाळुंकेत १००८ छेाटीछोटी शिवलिंगे बसविली गेल्याने तिचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. अर्थात या मंदिराच्या गाभार्‍यात जाण्याची परवानगी दिली जात नाही. काचेतूनच या १० फूट लंाबीच्या व ५० टन वजनाच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येते. बंगलोर येथून आणलेल्या ग्रॅनाईटच्या एकाच खडकातून हे लिंग कोरले गेले आहे. लिंगाच्या १० फूटांपैकी ५ फूट वर दिसतात तर पाच फुटाचे लिंग भूमिगत आहे. या भूमिगत भागात तारांचा कलश ठेवला गेला असून त्यात सात टन पारा आहे.

Leave a Comment