रविवारी ३ नंतर भुशी डॅमवर नो एंट्री


पुणे – सध्या सगळीकडे मस्त पावसाचा माहोल आहे. पावसाळा म्हटले की साऱ्यांना पिकनिकचे वेध लागतात. धबधब्याखाली मस्त एन्जॉय करायचा हा सगळ्यांचा प्लान ठरलेला. अनेकांच्या पसंतीच्या यादीत भुशी डॅम असेल त्या सर्व चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी असून पर्यटकांसाठी भुशी धरण दुपारी तीननंतर बंद ठेवण्यात येणार आहे.

दुपारी तीन नंतर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

हा निर्णय पावसाळा सुरु झाल्यापासून शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. दर वीकेंडला ५५ ते ६० हजार लोकसंख्या असणाऱ्या लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. केवळ तीन ते चार हजार वाहनांची येथील रस्त्यांची क्षमता असताना वीकेन्डच्या काळात लोणावळ्यातील रस्त्यांवर किमान ५० हजार वाहने असतात. त्यामुळे शहरावर प्रचंड ताण येतो, हे सगळे टाळण्यासाठी भुशी डॅम दुपारी तीन नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान तुम्ही पोलिसांनी दिलेल्या या सूचनांचे पालन न केल्यास, तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या नियमांचे पालन करा आणि तुमची पिकनिक आनंदी बनवा.

Leave a Comment