भविष्यात येणार विदाऊट बॅटरीचे फोन


मोबाईल व स्मार्टफोन तंत्रज्ञानात विविध सुविधा येऊ लागल्या आहेत. आता तीन महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज करावी लागेल असे फोन बाजारात येऊ घातले असतानाच त्यापुढे जाऊन संशोधक बॅटरी नसलेले फोन तयार करण्याचे प्रयोग करत आहेत. या प्रकारच्या प्राथमिक प्रयोगांना यश मिळाले असल्याने भविष्यात बॅटरी नसलेले स्मार्टफोन विकसित करणेही शक्य असल्याचा दावा संशोधक करत आहेत.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी बॅक्सकेटर तंत्रज्ञानावर आधारित या फोनचा प्रोटोटाईप सध्या तयार केला आहे.यामुळे भविष्यात बॅटरीलेस डिव्हायसेस यशस्वीरित्या बनविता येतील याचे संकेत मिळाले आहेत. सध्या तयार केलेला फोन बेसिक फिचर फोन आहे. त्याला कीपॅड सोबत छोटा एलईडी स्क्रीनही आहे. हे फोन वातावरणातील लो पॉवर रेडिओ सिग्नलचा वापर करून चालतात. या फोनच्या सहाय्याने १५ मीटर दूरवर असलेल्या माणसाशी संवाद साधणे शक्य झाले आहे. या संवादासाठी अगदी कमी एनर्जी लागते व ती वातावरणातील रेडिओ लहरीतूनच घेतली जाते. या फोनवरून सध्या कॉल व एसएमएस करण्यात संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान भविष्यात स्मार्टफोनसाठीही वापरता येईल असा विश्वास संशोधकांना वाटतो आहे.

Leave a Comment