मुंबईत प्रथमच रोबोटिक किडनी प्रत्यारोपण - Majha Paper

मुंबईत प्रथमच रोबोटिक किडनी प्रत्यारोपण


मुंबई – मुंबईतील एका महिलेने पती-पत्नीचे नाते हे जन्मा-जन्मांच असते. एकमेकांना सुख दु:खात साथ देण्याची शपथ केवळ थपथच न ठेवता सत्यात बदल करुन दाखवली आहे. अंधेरी येथे राहणारे सी. मुरलीधरन यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करुन ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

किडनी निकामी झाल्यामुळे मुरलीधरन यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्नी लीना यांची किडनी मुरलीधरन यांच्या किडनीशी जोडणारी असल्याने त्यांनी मुरलीधरन यांना किडनी देण्याचे ठरवले. गरजेच्या असलेल्या चाचण्या त्यानंतर करण्यात आल्या आणि मग मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्राद्वारे त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट केले गेले.

रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. अशाप्रकारे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट केलेले मुंबईतील मुरलीधरन हे पहिलेच रुग्ण असून या पद्धतीने शस्त्रक्रिया करणा-या देशातील इतर शहरांच्या यादीत आता मुंबईचा समावेश झाला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment