व्हॉट्सअॅपमध्ये जोडली गेली आणखी पाच नवी फिचर्स


मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवी फिचर्स आणली असून व्हॉट्सअॅप वापरणे या नव्या फिचर्समुळे अधिक सोपे होणार आहे तसेच व्हॉट्सअॅप यूजर्सना आणखी ऑप्शनही मिळणार आहे.

सर्च इमोजीचा ऑप्शन व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये देण्यात आल्यामुळे चॅटिंग करताना तुम्हाला हवी ती इमोजी सर्च करून पाठवता येणार आहे. चॅटिंग करताना प्रेमासाठीची इमोजी पाठवायची असेल तर सर्चमध्ये Love टाईप केल्यानंतर टूलबारमध्ये याबाबतच्या सगळ्या इमोजी येतील.

याआधी व्हॉट्सअॅपनं फॉण्ट बोल्ड करण्याचा ऑप्शन दिला होता पण आता वेगवेगळ्या फॉण्टमध्ये व्हॉट्सअॅप मेसेज पाठवता येणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅपचे नवे व्हर्जन 2.71.251वर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर आलेले महत्त्वाच्या मेसेजचा आता गुगल ड्राईव्हवर बॅक अप घेता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या Menu Button > Settings > Chats and calls > Chat backupवर जा. यानंतर Back up to Google Driveवर क्लिक करा आणि तुमच्या गरजेनुसार Daily, Weekly किंवा Monthly चॅटचा बॅक अप घ्या.

व्हॉट्सअॅपवरून आता महत्त्वाची डॉक्यूमेंट्सही पाठवता येणार आहेत. एका वेळी जास्तीत जास्त १०० एमबीची डॉक्यूमेंट्स व्हॉट्सअॅपवरून पाठवता येऊ शकणार आहेत. महत्त्वाचे मेसेज बूकमार्क करण्याचा ऑप्शन आत्तापर्यंत ईमेलवरच मिळत होता पण आता व्हॉट्सअॅप वरही महत्त्वाचे मेसेज बूकमार्क करता येणार आहेत.

Leave a Comment