मोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा जिओ घालणार धुमाकूळ


लवकरच दाखल होणार जिओचा ५०० रुपयांहून स्वस्त फोन
मुंबई – मोबाईल क्षेत्रात रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याची शक्यता असून मोफत इंटरनेट सुविधा ग्राहकांना दिल्यानंतर कंपनी आता आपला नवा मोबाईल बाजारात आणण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ४ जी सुविधा असणाऱ्या फोनची किंमत ५०० रुपयांहूनही कमी असण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ही घोषणा नुकतीच करण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. रिलायन्सने याआधीही काही वर्षांपूर्वी मोबाईल फोन बाजारात आणला होता. ग्राहकांकडून सुरुवातीला त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता.

रिलायन्स जिओतर्फे याशिवाय नवे प्लॅन्सही बाजारात आणणार आहे. येत्या दोन दिवसात हा प्लॅन जाहीर केला जाणार असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. हा टेरीफ प्लॅन जिओच्या ‘धन धना धन’ या प्लॅनप्रमाणे असू शकतो. ही ऑफर जिओने ११ एप्रिल रोजी लॉंच केली होती.

नव्याने बाजारात येणारा जिओचा ५०० रुपयांहून स्वस्त असणारा फोन फिचर फोन असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही खऱ्या अर्थाने पर्वणी असणार आहे. टेलिकॉम विषयातील तज्ज्ञांच्या मते जिओ प्रत्येक फोनमागे ६५० ते ९७५ रुपये सबसिडी देणार आहे. अशाप्रकारे स्वस्तातील फिचर फोन लॉंच करुन जिओ आपल्य अॅक्टीव्ह युजर्सची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave a Comment