जीएसटीमुळे असुसचे स्मार्टफोनही स्वस्त


नवी दिल्ली : जीएसटीनंतर अॅपलचे फोन स्वस्त झाले तर आता इतर स्मार्टफोन ब्रँड्सनेही स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. असुसने जेनफोन ३ (ZE552KL), जेनफोन ३ (ZE520KL) , जेनफोन ३ मॅक्स (ZC553KL) आणि जेनफोन ३S या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये तब्बल ३ हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे.

सध्या जेनफोन ३ (ZE552KL) १६ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत याआधी १९ हजार ९९९ रुपये होती. तर सध्या जेनफोन ३ (ZE520KL) ची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. अगोदर या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये होती. जेनफोन 3 मॅक्स (ZC553KL) च्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. हा फोन सध्या १४ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे, ज्याची किंमत अगोदर १५ हजार ९९९ रुपये होती. जेनफोन ३S च्या किंमतीतही दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. १४ हजार ९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनची किंमत सध्या १२ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे.

Leave a Comment