
ब्रिटीश लग्झरी कारमेकर अॅस्टीन मार्टिनने त्यांची डिबी ११ ही सुपरकार सादर केली आहे. या केव्ही ८ मॉडेलची युकेमधली किंमत १ कोटी २२ लाख रूपये असून २०१७ च्या चौथ्या तिमाहीत ती विक्रीसाठी उपलब्ध होईल असे समजते. ही कार २०१६ मध्ये ग्लोबली लाँच केलेल्या पहिल्या मॉडेलचे अपग्रेड व्हर्जन आहे. नवी कार ४.० लिटर ट्वीन टर्बोचार्ज व्ही ८ इंजिन ची आहे. पहिली डीबी ११ ५.२ लिटर ट्विन टर्बोचार्ज व्ही १२ इंजिनसह होती.
अॅस्टीन मार्टिनची देखणी, पॉवरफुल डीबी ११ सुपरकार
कंपनीतील इंजिनिअर्सनी दिलेल्या माहितीनुसार नवे मॉर्डल व्ही ८ इंजिनसह असल्याने व्ही १२ व्हेरिएंटपेक्षा ते वजनाने हलके आहे व त्यामुळे ड्रायव्हिंग कंफर्टमध्ये वाढ झाली आहे. ० ते १०० किमीचा वेग पकडण्यास या कारला ४ सेकंद लागतात व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०१ किमी. कारचे मायलेज लिटरला १०.९ किमी आहे. कारच्या एक्स्टीरियरमध्ये फार बदल केला गेलेला नाही. फिचर्समध्ये एबीएस, हिल असिस्ट, अत्याधुनिक सेन्सर आहेत व कारला उत्तम दर्जाची सिक्युरिटी फिचर्स आहेत.
