मेझू प्रो सेव्हन दोन स्क्रीनसहच येणार


मेझूच्या नव्या प्रो सेव्हन स्मार्टफोनला दोन स्क्रीन असणार हे आता पक्के झाले असून या फोनचे कांही फोटो मिडीयावर लिक झाले आहेत. या फोनला अन्य फोनप्रमाणे एक वाईड डिस्प्ले असेल तर दुसरा छोटा डिस्प्ले फोनच्या मागच्या बाजूला असेल. हा डिस्प्ले ई लिंक असू शकेल असे जाणकारांचे मत आहे. म्हणजे या स्क्रीनवर नोटिफिकेशन, बेसिक डिटेल्स दिसतील,

लिंक झालेल्या फोटोंनुसार या फोनला ५.५ अथवा ५.७ इंची डिस्प्ले असेल. अँड्राईड नगेट ७.० वर आधारित मेझू कस्टम यूआय त्याला दिला जाईल. तसेच फोनमधील होमबटणच फिंगरप्रिंट स्कॅनरचे काम करेल, ड्युल टोन एलईडी फ्लॅशसह रियर ड्यूल कॅमेरा सेटअप या फोटोमध्ये दिसतो आहे. हा फोन लाँच होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Comment