बहुप्रतिक्षित, ऑल न्यू बीएमडब्ल्यू गुरूवारी मास्टरब्लास्टर सचिनच्या हस्ते मुंबईत लाँच करण्यात आली. चार व्हेरिएंटमध्ये ती ग्राहकांना उपलब्ध होणार असून त्यांच्या किंमती एक्स शो रूम ४९.९० ते ६२ लाख रूपयांच्या दरम्यान आहेत. ५२० डी स्पोर्ट लाईन, ५३० आय स्पोर्ट या दोन व्हेरिएंटची किंमत ४९.९० लाख रूपये आहे. ५२० डी लग्झरी ५३.६० लाख रूपयांत असून ५३० डी एम स्पोर्ट ६१.३० लाखांत आहे. या सर्व किंमती जीएसटी लागू झाल्यानंतरच्या आहेत.
भारतात बीएमडब्ल्यू फाईव्ह सिरीज लाँच
या कार तीन इंजिन ऑप्शन्समध्ये आहेत. २.० लिटर चार सिलींडर डिझेल, पॉवरफुल ३.० लिटर ६ डिझेल. या कार्सना रिमोट पार्किंग असिस्टंट, मल्टीझोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रीक सीट, एलईडी हेडलाईट, ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशी फिचर्स आहेत.