पॉवरफुल बॅटरीचा टर्बो ५ लाँच


इनफोकसने त्यांचा नवा स्मार्टफोन भारतात दिल्लीत झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच केला असून टर्बो ५ या नावाने तो लाँच झाला आहे. या फोनचे वैशिष्ठ आहे त्याची ५ हजार एमएएच क्षमतेची पॉवरफुल बॅटरी. ई कॉमर्स कंपनी अमेझॉनवर तो ४ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे.

या फोनसाठी ५.२ इंचाचा एचपी आयपीएस डिस्प्ले, १३ एमपीचा ऑटेाफोकस रियर कॅमेरा तर ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. अॅड्राईड ७.० नगेट ओएस, बॅकसाईडला फिंगरप्रिंट सेन्सर, कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी व्होल्ट, वायफाय, मायक्रो यूएसबी, जीपीएस, ए जीपीएस अशी ऑप्शन्स आहेत. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये आहे. २ जीबी रॅम १६ जीबी स्टोरेज व ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज अशी ही दोन व्हेरिएंट असून त्यांच्या किमती अनुक्रमे ६९९९ व ७९९९ रूपये आहेत.

Leave a Comment