
न्यूयॉर्क : बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानही बदलत असते. सुरुवातीच्या काळातील संगणक आणि सध्याचा संगणक यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. संगणकांच्या अन्यही भागांचे आता रूपडे पालटत चालले आहे. आपल्या लेटेस्ट डेस्कटॉपसाठी ब्ल्यू टूथ कीबोर्डवर ‘मायक्रोसॉफ्ट’ने संशोधन केले असून, हा कीबोर्ड स्पेशल असेल. म्हणजे त्याच्यावर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.
लवकरच तुमच्या दिमतीला येत आहे मायक्रोसॉफ्टचा नवा किबोर्ड
‘मॉडर्न कीबोर्ड’असे मायक्रोसॉफ्टने त्याचे नामकरण केले असून त्याचे कोडनेम ‘सी ३ के १७८०’आहे. या कीबोर्डचे प्रात्यक्षिक येत्या २३ मे रोजी शांघाय येथे होत असलेल्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये दिले जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. विंडोज टेन पुशसह हा कीबोर्ड फिट करण्याची कंपनीची योजना आहे. हा कीबोर्ड सरफेस कीबोर्डप्रमाणेच असेल. गतवर्षी सरफेस कीबोर्ड सरफेस स्टुडिओच्या सहकार्याने कंपनीने लाँच केला होता.
मॉडर्न कीबोर्डमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर न्यूमॅरिक की पॅडच्या आसपास फिट केला जाईल, असे सांगितले जात आहे. यामुळे युजरला हार्डवेअर कीबोर्ड वापरताना अडचण येणार नाही. या कीबोर्डमध्ये काही नवी फिचर्सही दिली जातील.
