डुकाटीच्या १२००CCच्या बाइकची किमत २० लाखाच्या घरात


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी इटलीची प्रसिद्ध ऑटोमेकर कंपनी डुकाटीने आपली नवी १२०० सीसीची Multistrada 1200 Enduro Pro बाइक लाँच केली असून दिल्ली एक्स-शोरुममध्ये ही बाइक २० लाखात मिळणार आहे.

या नव्या बाइकमध्ये ११९८ सीसीचे एल-र्टिंन मोटार टेस्टाट्रेटा इंजिन देण्यात आले असून, या इंजिनच्या माध्यमातून ९५०० आरपीएमवर १५७ बीएचपीची पॉवर आणि ७५०० आरपीएमवर १३६ एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे. एबीएस, ट्रक्शन कंट्रोल, व्हिली कंट्रोल, ४ रायडिंग मोडस् कंट्रोल देण्यात आले आहे.

Leave a Comment