पॅनकार्डसाठी आधार कार्ड द्यावेच लागणार


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पॅनकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. शिवाय पॅनकार्डला आधार कार्ड नंबरशी जोडणे ही अनिवार्य झाले आहे.

पॅनकार्डसाठी आधार नंबर किंवा त्याचा अर्ज क्रमांक देणे सरकारने अनिवार्य केले आहे. सरकारने याबाबत नवे आयकर नियम जाहीर केले आहे. आयकर विभागाने पॅन नंबर आधार नंबरशी जोडण्यासाठी ई-फायलिंग वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर आणि आधार नंबर लिंकिग करणे सोपे होईल. दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आधार आणि पॅन नंबर लिंक करु शकता.