व्होडाफोन ग्राहक आता १ वर्ष फ्रीमध्ये बघणार टीव्ही


मुंबई : सध्या देशात डिजिटल क्रांतीचे वातावरण असल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्य़ा प्रमाणात होणार आहे. आता दूरसंचार कंपनी व्होडाफोनने डिजिटल क्रांतीमध्ये उडी घेत त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. ग्राहकांना या ऑफर अंतर्गत मोफत एक वर्ष ऑनलाइन टीव्हीचा आनंद घेता येणार आहे. कंपनीने ही ऑफर रेड पोस्टपेड युजर्ससाठी सुरुवातीला आणली आहे.

युजर्स नेटफ्लिक्स इंडिया या ऑफरचा फायदा व्होडाफोनचे रेड पोस्टपेड घेऊ शकता. ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना १२९९ किंवा त्याच्या पेक्षा अधिकचा पॅक अॅक्टीवेट करावा लागेल. व्होडाफोन इंडियाचे रेड पोस्टपेड प्लान ३९९ रुपयांपासून २९९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. व्होडाफोन रेड एक पोस्टपेड स्पेशल प्लान आहे ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त कॉल, डेटा आणि एसएमएस सेवा मिळते. ही ऑफर तुम्ही नवीन पोस्टपेड कनेक्शन घेऊन ही मिळवू शकता.

कंपनीनुसार व्होडाफोनच्या ऑनलाइन स्टोअर किंवा Netflix टाईपकरुन १९९ या नंबरवर मॅसेज पाठवावा. या ऑफरनुसार ग्राहकाला दर महिन्याला ५०० रुपयांचे क्रेडिट दिले जाईल. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने ही ऑफर आणली आहे.

Leave a Comment